गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरली तर टीम इंडिया पाचवी वन-डे हरणार

श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सिरीजमध्ये टीम इंडियाने ४-०ने आघाडी घेतली आहे. रविवारी होणारी मॅच जिंकल्यास टीम इंडिया नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 2, 2017, 10:04 PM IST
गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरली तर टीम इंडिया पाचवी वन-डे हरणार title=

नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सिरीजमध्ये टीम इंडियाने ४-०ने आघाडी घेतली आहे. रविवारी होणारी मॅच जिंकल्यास टीम इंडिया नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.

भारताने रविवारी होणारी पाचवी वन-डे मॅच जिंकल्यास श्रीलंकेत ५-०ने पहिल्यांदाच हरविण्याचा रेकॉर्ड टीम इंडिया आपल्या नावावर करेल. दोन्ही टीम्सचा सध्याचा परफॉर्मंस पाहता टीम इंडिया ही मॅच जिंकेल असे दिसत आहे.

मात्र, वन-डे सिरीज सुरु होण्यापूर्वी सुनील गावस्कर यांनी एक महत्वपूर्ण भविष्यवाणी केली होती. गावस्कर यांनी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली तर टीम इंडिया शेवटच्या वन-डे मॅचमध्ये पराभूत होईल.

सुनील गावस्कर यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, टीम इंडिया वन-डे सिरीजमध्ये क्लीन स्विप करु शकणार नाही. माझ्या मते, टीम इंडिया श्रीलंकेवर कमीत कमी ४-१ने मात करु शकेल. सध्या टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे हे होणं शक्यही आहे.

दरम्यान, यापूर्वी टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानात २०१४-१५ साली श्रीलंकेवर ५-०ने मात केली होती. आता भारत दुस-यांदा श्रीलंकेवर ५-०ने मात करण्याच्या तयारीत आहे आणि तेही श्रीलंकेमध्ये.