IPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं?

IPL मध्ये बिहार टीम असती तर....लोकांनी सुचवली भन्नाट नावं, तुम्हाला एखादं भारी नाव सुचतंय का?

Updated: Mar 26, 2022, 05:04 PM IST
IPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं? title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता आज पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा रंगली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ अशा दोन संघाचा समावेश करण्यात आला आहे. 

सोशल मीडियावर आता बिहारची टीम आयपीएलमध्ये उतरली तर त्याचं नाव काय असेल यावर चर्चा रंगली आहे. युजर्सनी खूपच भन्नाट नावं सुचवली आहेत. @Nirdayiii नावाच्या युजरने मजेशीर ट्वीट करत प्रश्न विचारला की जर आयपीएलमध्ये बिहारची टीम असती तर त्या टीमचं नाव काय असतं? 

या युजरने जिया हो बिहार के लाला’ हे नाव तर असू शकत नाही असं म्हटलं त्यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या तर काही मीम्सही व्हायरल करण्यात आले. कोणी पटना पँथर्स, दरभंगा डॅगर्स अशी नाव सुचवली तर कोणी सत्तू सुपरचार्जर्स सारखे अजून मजेशीर नाव सुचवली आहे. 

एक युजरने तर लिट्टी-चोखा असं नाव असेल असं मजेशीर ट्वीट देखील केलं आहे. लिट्टी चोखा वॉरियर्स, ठेकुआ किंग्स अशी अनेक नाव सुचवण्यात आली. आयपीएलमध्ये यंद गुजरात आणि लखनऊ संघ नवीन आले आहेत. 10 संघांमध्ये 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. 

आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. मात्र सोशल मीडियावर युजर्सनी बिहारच्या नावावरून तुफान चर्चा रंगवली आहे. सध्या याचीच खूप चर्चा सुरू आहे.