तो फक्त स्वतःचा विचार करतो; Virat Kohli वर लावला गेला स्वार्थीपणाचा आरोप

आजच्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यासोबत कोहलीच्या एका निर्णयानंतर त्याला स्वार्थी म्हटलं जातंय. 

Updated: Dec 14, 2022, 09:20 PM IST
तो फक्त स्वतःचा विचार करतो; Virat Kohli वर लावला गेला स्वार्थीपणाचा आरोप title=

Virat Kohli Selfish : बांगलादेशविरूद्ध भारत (IndvsBan) यांच्यात 2 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. यामधील पहिला सामना आजपासून सुरु झालाय. टीम इंडियाचा कर्णधार के.एल. राहुलने (K.L.Rahul) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या शेवटी भारताने 6 विकेट्स गमावत 278 रन्स केले. यामध्ये उपकर्णधार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यासोबत कोहलीच्या एका निर्णयानंतर त्याला स्वार्थी म्हटलं जातंय. 

विराट आजच्या सामन्यात अवघ्या 1 रनवर माघारी परतला. यासोबत त्याने डीआरएसची अपील केली, मात्र मैदानी अंपायरचा निर्णय योग्य असल्याने रिव्ह्यू वाया गेला. यानंतर चाहते विराटचा स्वार्थीपणा पाहून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करतायत. कोहलीची विकेट पाहून स्पष्ट कळतंय की, तो आऊट आहे. 

नेमकं काय घडलं?

बांगलादेशाचा लेफ्ट आर्म स्पिनर तैजुल इस्लामच्या फिरकी बॉल फलंदाज विराट कोहलीला खेळता आला नाही. मुळात त्याला गोलंदाजाचा बॉल समजलाच नाही. त्यामुळे आऊट झाल्यानंतर देखील तो क्रिजवर उभाच होता. कोहलीला आशा नव्हती की, बॉल अशा पद्धतीने टर्न होईल. 

टीम इंडिया फलंदाजी करत असताना 20 वी ओव्हर तैजुल इस्लाम करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विराट कोहली स्ट्राईकवर होता. बॉलला तैजुलने विराटच्या पॅडपासून थोडं मागे ठेवलं. हा बॉल विराटने बॅकफूटवर जाऊन खेळला. मात्र यावेळी बॉल इतका जास्त टर्न झाला आणि थेट विराटच्या मागील पॅटवर जाऊन आदळला. गोलंदाजाने अपील केल्यानंतर अंपायरने त्याला आऊट करार दिला. विराटने डीआरएसनेचाही वापर केला, मात्र तो व्यर्थ गेला. विराट कोहलीच्या या निर्णयावरून चाहते नाराज झालेत.

कोहलीची 'विराट' कामगिरी

विराट 8 व्या क्रमांकावरुन 6 व्या स्थानी पोहचला आहे. तर इशानने थेट 117 व्या क्रमांकावरुन 37 व्या स्थानी लाँग जंप घेतलीय.  विराटने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 113 तर इशानने 210 धावांची विक्रमी खेळी केली होती.  दुसऱ्या बाजूला मुंबईकर श्रेयस अय्यर 20 व्या क्रमांकावरुन 15 व्या स्थानी आलाय. गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज 26 वरुन 22 व्या स्थानी विराजमान झालाय.