मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेत १३ धावाने पराभव केला आणि व्हाईट वॉशची नामुष्की टाळली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावांचे टार्गेट ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हार्दिक-जडेजाच्या जोडीने संयमी आणि तितकीच तडाखेबंद फलंदाजी करत एक मोठे टार्गेट कांगारूंसमोर ठेवले. आजचा सामना जिंकून भआरताने आपली प्रतिष्ठा राखलीय. पहिले दोन सामने भारताने गमावले होते.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी हवत क्लीन स्वीपपासून स्वत:ला बचावले. पहिले दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये कांगारूंनी बाजी मारत एकदिवसीय मालिका खिशात टाकली. मात्र, आज ते टीम इंडियाला हरवणार का, याची उत्सुकता होती. भारतीय संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करत विजय मिळविला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५ गडी गमावून ३०२ धावा केल्या. हार्दिक पांड्याने चांगली बॅटिंग करताना नाबाद ९२ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २८९ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांच्यातील शतकी भागीदारी झाली. तर कर्णधार विराट कोहली याच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने ३०२ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत सामना जिंकण्यासाठी झुंज दिली, परंतु भारतीय गोलंदाजी पुढे त्यांचे काहीही चालले नाही. ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी केली. भारतीय गोलंदाजीवर हल्लाबोल चढवत मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम राखले. ३८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह मॅक्सवेलने ५९ धावा केल्या. मात्र, बुमराहने त्याचा बळी घेताना दांड्या गुल केल्या.