Shubhman gill Drop from Squad : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात आज दुसरा टी-20 सामना होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळला जात आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशातच आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी रोहित शर्माने किंग कोहलीला संघात स्थान दिलंय. अशातच आता रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना मोठा निर्णय घेतला असून शुभमन गिलला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे.
रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर बसवलंय. त्याचबरोबर तिलक वर्माला देखील संघाबाहेर ठेऊन विराट कोहली अन् यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे. त्यामुळे आता रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात अशी चर्चा क्रिडाविश्वात होताना पहायला मिळत आहे.
पहिल्या सामन्यात नेमकं काय झालं होतं?
पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्माने दुसरा चेंडू मिड ऑफच्या दिशेने टोलवला होता. त्यावेळी रोहितने कॉल देत नॉन स्ट्राईक इन्डला धाव घेतली होती. त्यावेळी शुभमन गिलने धाव घेतलीच नाही, त्यामुळे टीम इंडियाला पहिलाच मोठा धक्का बसला. रोहित सुसाट सुटला मात्र शुभमन पळालाच नाही. त्यामुळे रोहितला शुभमनच्या चुकीची शिक्षा झाली. त्याला मैदान सोडावं लागलं होतं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.