Ind vs Aus: दुखापतीनंतर ही या खेळाडूची मैदानावर ३ तास झुंज

दुखापतग्रस्त असूनही मैदानावर संघर्ष

Updated: Jan 11, 2021, 02:35 PM IST
Ind vs Aus: दुखापतीनंतर ही या खेळाडूची मैदानावर ३ तास झुंज title=

सिडनी : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी चांगली फलंदाजी करत सामना ड्रॉ केला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पोंटिगने अंदाज व्यक्त केला होता की, टीम इंडिया दुसर्‍या इनिंगमध्ये २०० रनही करु शकणार नाही. या सामन्यात भारतीय फलंदाज हनुमा विहारीने दुखापतीनंतरही तीन तासांपेक्षा जास्त काळ फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या 6 गोलंदाजांचा सामना केला. पण विकेट गमवली नाही.

दुसर्‍या डावात ६ विकेट्स गमवत ३१२ रन करुन ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. टीम इंडियापुढे विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य होते, जे अशक्य मानले जात होते. चौथ्या दिवशी भारताच्या दोन विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयाची आशा होती. पण दुखापतग्रस्त असूनही हनुमा विहारी आणि आर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या या आशेवर पाणी फेरलं.

हॅमस्ट्रिंगची दुखापतीनंतर ही हनुमा विहारीने मैदान सोडले नाही. १६१ बॉलमध्ये २३ धावांची खेळी करून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. चेतेश्वर पुजाराची पाचवी विकेट पडली. तेव्हा भारतीय संघाचा स्कोर २७१ रन होता. आणि त्यानंतर हनुमा विहारीने अश्विनला साथ दिली. भारताला 334 धावांवर पोहोचवले. पण विकेट सांभाळून ठेवली. चहाच्याआधी दुखापत झालेल्या हनुमाने पाचव्या दिवशी शेवटचा चेंडू टाकण्यापर्यंत मैदान सोडलं नाही. दुखापतीमुळे तो चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाहीये.

मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, कॅमरून ग्रीन आणि मार्नस लाबुशाने या सहा गोलंदाजांनी हनुमाची विकेट घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण तरी देखील त्याने संघर्ष सुरु ठेवला.