Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचं दमदार पुनरागमन! 5 स्टार कामगिरी करत कांगारुंना गुंडाळलं

Ravindra Jadeja registers his five wicket haul: रविंद्र जडेजाने दमदार पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेतल्या असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

Updated: Feb 9, 2023, 04:14 PM IST
Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचं दमदार पुनरागमन! 5 स्टार कामगिरी करत कांगारुंना गुंडाळलं title=
Ravindra Jadeja registers his five wicket haul

IND vs AUS Comeback man Ravindra Jadeja registers his five wicket haul: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीमधील दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांना पूर्ण 90 षटकंही खेळता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांवर आटोपला. आधी जलद गोलंदाजांनी आणि नंतर फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. विशेष म्हणजे या मालिकेमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने 5 विकेट्स घेतल्या. 

36 व्या षटकच्या पाचव्या चेंडूवर मार्नस लॅबुशेनला बाद केलं. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर म्हणजेच पुढच्या चेंडूवर जडेजाने मॅट रेनशॉला एलबीडब्ल्यू केलं. आपल्या पहिल्याच चेंडूवर रेनशॉ माघारी परतला. त्यानंतर सामन्यातील 42 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाच्या फिरकीवर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ बोल्ड झाला. स्मिथला जडेजाचा चेंडू समजलाच नाही.

केवळ स्मिथच नाही तर सेट झालेल्या पीटर हँड्सकॉम्बलाही जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. 31 धावांवर पीटर हँड्सकॉम्ब एलबीडब्ल्यू झाला. टॉड मर्फीच्या रुपात जडेजाला पाचवी विकेट मिळाली. मर्फीही एलबीडब्ल्यू बाद झाला.

जडेजा मागील काही आठवड्यांपासून मैदानापासून दूर होता. जडेजाची शस्त्रक्रीया झाल्याने त्याला न्यूझीलंविरुद्धच्या मालिकेत पूर्ण विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अनेक तरुण खेळाडूंची चांगली कामगिरी केल्याने जडेजाला संधी मिळेल की नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र जडेजाने आजच्या सामन्यामधून पु्न्हा एकदा आपलं महत्त्व अधोरेखित केलं आहे. अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर जडेजाचे क्रिकेट चाहत्यांची मन जिंकली. सोशल मीडियावरही जडेजावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. पाहूयात चाहत्यांच्या काही कमेंट्स

1) भन्नाट...

2) हे दोघेही टेस्टमध्ये नंबर एक आणि दोन आहेत

3) तीनदा स्मिथला बाद करणारा पहिलाच

4) याला म्हणतात कम बॅक

5) जाळ अन् धूर संगच

भारताने फलंदाजी करताना पहिल्या 12 षटकांमध्ये 38 धावांपर्यंत मजल मारली आहे. रोहित शर्माने दमदार सुरुवात केली असून त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.