Ind vs Aus : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा १२ रनने पराभव

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा धक्का

Updated: Dec 8, 2020, 05:36 PM IST
Ind vs Aus : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा १२ रनने पराभव

सिडनी : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. भारताचा या सामन्यात १२ रनने पराभव झाला आहे. भारतीय संघाने टी-२० मालिका २-१ ने जिंकली आहे. याआधी भारताने वनडे मालिका २-१ ने गमावली होती. भारतीय संघ २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमवत १७४ रनच करु शकला.

आज भारताने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस़्ट्रेलियाकडून मॅथिव वेडने ८० रनची खेळी केली. मॅक्सवेलने ३६ बॉलमध्ये ५४ रन केले तर स्मिथने २४ रन केले. भारताकडून विराट कोहलीने ६१ बॉलमध्ये ८५ रनची शानदार खेळी केली. पण तो सामना विजयापर्यंत नेऊ शकला नाही. शिखर धवनने २८ तर हार्दिक पांड्याने २० रन केले. केएल राहुल आणि अय्यर शुन्यावर आऊट झाले. 

ऑस्ट्रेलियाकडून आज मिचेल स्वेपसनने ३ विकेट घेतल्या. तर भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ विकेट घेतल्या.