India vs Australia, 1st ODI : आगामी क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना मोहलीच्या मैदानावर खेळवला जातोय. वर्ल्ड कपपूर्वी प्रयोगाची शेवटची संधी टीम इंडियाकडे असणार आहे. त्यामुळे आता केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियामधील विविध पर्यायाचा अवलंब करताना दिसतोय. आशिया कपमध्ये पुरेशी संधी न मिळालेल्या मोहम्मद शमीला (Mohammad Shami) पहिल्या सामन्यात सामील करून घेतलं. अशातच पहिल्यांदाच शमीने संधीचं सोनं केल्याचं पहायला मिळतंय.
सामन्याची पहिली ओव्हर शमीला देण्यात आली. पहिल्याच ओव्हरमध्ये शमीने सलामीवीर मिशन मार्शला तंबुत पाठवलं. एका परफेक्ट आऊटस्विंग बॉलवर शमीने पहिली विकेट काढून दिली. त्यानंतर स्टिव स्मिथ (Steve Smith) अन् डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाची खेळ सांभाळला. मात्र, डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथ दोन्ही मजबूतीने पाय जमवू लागल्यावर राहुलने पुन्हा विश्वासू शमीच्या हातात बॉल दिला. त्यानंतर शमीने एका परफेक्ट बॉलवर स्मिथच्या दांड्या उडवल्या. 22 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर शमीने इनस्विंग केला अन् स्मिथला पहिला नाही, दुसरा नाही तर तिसरा स्टंप उडवला. शमीच्या या बॉलवर भारताला तिसरी विकेट मिळाली.
Muhammad Shami delivery against Smith #WorldCup2023 Warner #Chandrayaan3 Faizabad #RameshBidhuri #PragyanRover Danish #canadaindia #OpenAI #INDvAUS #TejRan #abhiya #INDvsAUS Suspend #AppleStore #winvivoT2Pro #Scarlet Chico #ICCWorldCup2023# pic.twitter.com/RbaQCJ33sS
— Syeda Hadia (@gold_leaf222) September 22, 2023
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (W), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (C), शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C) इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.