IND vs AUS, WTC 2023 Final: यंदाची आयपीएल चर्चेत राहिली ती आरसीबी आणि लखनऊ यांच्यात झालेल्या वादामुळे. या वादात कळीचा नारद राहिला तो मोहम्मद सिराज. सिराजमुळेच (Mohammed Siraj) विराट कोहली आणि गौतम गंभीरची भांडणं झाली, अशी चर्चा आजही होते. अशातच आता मोहम्मद सिराज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC Final 2023) देखील सुरू झालाय. सामन्याच्या पहिल्याच दिवशी सिराजने रौद्ररूप दाखवलं. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
टॉस जिंकून रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. रोहितचा हा निर्णय मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) खरा ठरवला. फक्त दोन धावा झाल्या असताना सिराजने सलामीवीर उस्मान ख्वाजा याला तंबूत पाठवलं. त्यानंतर सिराजने दोन्ही हात फैलावत जोरदार सेलिब्रेशन केलं. सिराजने सुरूवातीला धारदार गोलंदाजी केली. मात्र, नंतर त्याची लाईन आणि लेंथ चांगलीच बिघडली. 76 वर 3 गडी बाद अशी परिस्थितीतून कांगारूंनी जोरदार कमबॅक केलं.
आणखी वाचा - WTC Final 2023: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (ICC World Test Championship Final 2023) सामन्यात ट्रॅव्हिस हेडने दमदार शतक ठोकलंच. त्याआधी मार्नस लॅबुशेन याने 62 बॉलमध्ये 26 धावा करत डेव्हिड वॉर्नरला (David Warner) मोलाची साथ दिली होती. भारतीय गोलंदाजांना ना वॉर्नर आऊट होत होता ना लॅबुशेन. त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी पिचचा अंदाज घेऊन बाऊंसरचा मारा केला. त्याचवेळी सिराजचा एक बाऊंसर बॉल लॅबुशेनच्या हातावर बसला. त्यानंतर सिराजच्या पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने लॅबुशेनला (Marnus Labuschagne) खुन्नस दिली. त्याचा फोटो आणि व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर ट्रेड करत आहे.
Siraj vs Labuschagne
Hogya battle start #WTCFinal #INDvsAUS #WTCFinalOnStar pic.twitter.com/0txt9I6PDn
— Pankaj Yadav (@being_urself01) June 7, 2023
दरम्यान, लंडनमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर (Kennington Oval) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ट्रॅव्हिस हेड (Travis Head) 146 तर स्टीव्ह स्मिथ (Steven Smith) 95 धावा करत नाबाद राहिले आहेत.