IND vs AUS: पंतप्रधान मोदी यांची क्रिकेट कूटनीति, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत स्टेडियमवर उपस्थित

India vs Australia Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  टीम इंडिया मालिकेत 2-1 ने पुढे आहे. असं असलं तरी मालिका विजयासाठी हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे. 

Updated: Mar 9, 2023, 09:59 AM IST
IND vs AUS: पंतप्रधान मोदी यांची क्रिकेट कूटनीति, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत स्टेडियमवर उपस्थित title=

India vs Australia, 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने पुढे आहे. असं असलं तरी मालिका विजयासाठी हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे. 

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दीड तास थांबणार

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आहेत. चाहत्यांमध्ये या सामन्याची प्रचंड उत्सुकता असून, स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज आणि भारताचे पीएम मोदी हे दोघेही एकत्र मॅचचा आनंद लुटतील.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दीड तास थांबणार असून ते खेळाडूंचीही भेट घेणार आहेत.

रोहित शर्माने घेतले हे मोठे निर्णय

अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात मोठे निर्णय घेत रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलसह टीम इंडियासाठी सलामी देणार आहे.

रोहित शर्मा सर्वाधिक 207 धावा करणारा फलंदाज

रोहित शर्मा सध्याच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 207 धावा करणारा फलंदाज आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. अशा परिस्थितीत रोहित शर्माला या मैदानावर द्विशतक झळकावण्याची संधी आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावताना रोहित शर्माने 120 धावांची खेळी केली. मात्र, या कसोटी सामन्यानंतर तो अर्धशतकासाठीही संघर्ष करताना दिसला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी सामन्यात फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल, जो बॉल आणि बॅटने टीम इंडियाला मजबूत करेल. स्पेशालिस्ट यष्टीरक्षक केएस भरत 7व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. कर्णधार रोहित शर्माने केएस भरतवर विश्वास दाखवला आहे. 

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज.