या शॉटमुळे रोहित शर्मा ट्रोल, पाहा भन्नाट मीम्स

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला.

Updated: Mar 14, 2019, 08:45 PM IST
या शॉटमुळे रोहित शर्मा ट्रोल, पाहा भन्नाट मीम्स title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे भारताने ही सीरिज ३-२ ने गमावली. महत्त्वाचं म्हणजे या सीरिजच्या पहिल्या दोन मॅच जिंकल्यानंतर पुढच्या लागोपाठ तीन मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. मागच्या चार वर्षांमधला भारताचा मायदेशातला हा वनडे सीरिजमधला पहिला पराभव आहे. याआधी २०१५ साली भारताला दक्षिण आफ्रिकेनं ३-२ ने हरवलं होतं.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २७३ रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. चौथ्या मॅचमध्ये शतक करणारा शिखर धवन या मॅचमध्ये स्वस्तात बाद झाला. पण त्याचा ओपनिंगचा सहकारी रोहित शर्माने किल्ला लढवला. रोहित शर्माने ८९ बॉलमध्ये ५६ रनची खेळी केली. या मॅचमधली भारताची ही सर्वाधिक मोठी खेळी होती. रोहित शर्माचं हे वनडे क्रिकेटमधलं ४१वं अर्धशतक होतं. पण एडम झम्पाच्या बॉलिंगवर एलेक्स केरी याने रोहितला स्टम्पिंग केलं. मोठ्या गमतीदार पद्धतीने रोहित शर्मा स्टम्पिंग झाला. रोहितच्या हातातून बॅट सुटल्यामुळे त्याला क्रीजमध्ये जाता आलं नाही. याच संधीचा फायदा एलेक्स केरीनं घेतला. रोहित शर्माच्या या स्टम्पिंगमुळे तो सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होतो आहे.

रोहितचं रेकॉर्ड

या मॅचमध्ये रोहितने वनडे क्रिकेटमध्ये ८ हजार रनचा टप्पा गाठला तसंच ओपनर म्हणून रोहितच्या नावावर वनडेमध्ये ६ हजार रनही झाले आहेत. ओपनर म्हणून रोहित शर्मानं सगळ्यात जलद ६ हजार रनचा टप्पा गाठला आहे. १२१व्या डावामध्ये रोहित शर्माने हा विक्रम केला आहे. याआधी हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होतं. हाशीम आमलाने १२३ डावांमध्ये आणि सचिन तेंडुलकर याने १३३ डावांमध्ये ओपनर म्हणून ६ हजार रन केले होते.

याचबरोबर रोहित शर्माने या मॅचमध्ये सौरव गांगुलीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमध्ये ८ हजार रन झाल्या आहेत. रोहित शर्मा आणि सौरव गांगुली या दोघांनी २०६व्या वनडे इनिंगमध्ये हे रेकॉर्ड केलं आहे. सगळ्यात जलद ८ हजार रन पूर्ण करण्याच्याबाबतीत सौरव गांगुली आणि रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत विराट कोहली पहिल्या आणि एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने १७५ वनडे इनिंगमध्ये आणि एबीने १८२ वनडे इनिंगमध्ये ८ हजार रनचा टप्पा ओलांडला होता.