ढाका : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN 1st Odi) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेपासून होतेय. मालिकेतील पहिला सामना मीरपूरमध्ये करण्यात आलाय. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यामुळे वनडे सीरिजमध्ये कोण कुणावर वरचढ राहिलंय, हे आपण आकडेवारीत जाणून घेऊयात. (ind vs ban 1st odi team india vs bangladesh head to head records see stats india tour of bangladesh 2022)
उभयसंघात आतापर्यंत 35 वनडे खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिलीय. टीम इंडियाने 30 सामन्यात विजय मिळवलाय. तर बांगलादेश फक्त 5 सामन्यात यशस्वी ठरलीय. त्यामुळे आकडेवारीच्या नजरेने टीम इंडिया मजबूत आहे.
Just 1️ sleep away from the #BANvIND ODI series opener #TeamIndia pic.twitter.com/HKmyUgtqh1
— BCCI (@BCCI) December 3, 2022
एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश
लिट्टन दास (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ होसैन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद (दुखापतग्रस्त), हसन महमूद, इबादत होसैन, नसुम अहमद, महमूदुल्लाह, नजमुल होसैन शंटो, काजी, नूरुल हसन सोहन आणि शोरीफुल हसन (राखीव)
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.