India Vs Bangladesh 1st test match 2nd day : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे पहिला टेस्ट सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करून भारताने 376 धावांची आघाडी घेतली. मात्र भारताची ही आघाडी मोडताना भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची हालत खराब झाली. पहिले जसप्रीत बुमराह मग नंतर आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजांच्या दांड्या उडवून त्यांना स्वस्तात माघारी धाडले. यात आकाश दीपने लागोपाठ दोन बॉलवर बांगलादेशच्या दोन विकेट्स घेतल्या.
शुक्रवारी बांगलादेशचे फलंदाज भारताची आघाडी मोडण्याकरता मैदानात उतरले. परंतु पहिल्याच ओव्हरला जसप्रीत बुमराहने बांग्लादेशच्या सलामी फलंदाजाची शिकार केली. बुमराहने शादमान इस्लाम याला बोल्ड आउट केले. त्यानंतर हाच झंझावात आकाश दीपने सुरु ठेवला. नवव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आकाशने झाकीर हसन याला बोल्ड केले. यावेळी आकाशने टाकलेय बॉलचा वेग इतका जास्त होता की बॉल स्टंपवर आदळल्याने मिडल स्टंप तुटला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर आकाशने पुन्हा एकदा मोमिनुल हक याला बोल्ड आउट करून पॅव्हेलियनमध्ये धाडले. तिसऱ्या बॉलवर आकाश दीपकडे हॅट्रिक घेण्याची संधी होती मात्र यावेळी तो थोडक्यात चुकला आणि त्याची संधी हुकली. आकाश दीपने 23 फेब्रुवारी 2024 रोजी इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Deep impact #IDFCFirstBankTestSeries #INDvBAN #JioCinemaSports pic.twitter.com/NafbMhr1W3
— JioCinema (@JioCinema) September 20, 2024
गुरुवार 19 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली. पहिला टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी आर अश्विन याने दणदणीत शतक ठोकले. त्याने 108 बॉलमध्ये 100 धावा केल्या यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. अश्विनचे टेस्ट क्रिकेटमधील हे 5 वे शतक होते. रवींद्र जडेजाने देखील 85 धावांची खेळी केली. जडेजा आणि अश्विन या दोघांनी जवळपास 195 धावांची पार्टनरशिप केली.
हेही वाचा : IND VS BAN Test : बुमबुम बुमराह! बांगलादेशला दिला पहिला झटका, काहीही कळण्याच्या आत उडवल्या दांड्या Video
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा