IND vs BAN: भारतीय संघात रातोरात मोठा बदल; शेवटच्या क्षणी संघात 'या' खेळाडूला स्थान

IND vs BAN 3rd Odi Match: 10 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या संघासोबत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया (Team India)मध्ये रातोरात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

Updated: Dec 9, 2022, 12:43 PM IST
IND vs BAN: भारतीय संघात रातोरात मोठा बदल; शेवटच्या क्षणी संघात 'या' खेळाडूला स्थान  title=
IND vs BAN 3rd Odi Kuldeep Yadav added to team india latest sports news in marathi

IND vs BAN 3rd Odi Match: 10 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या चटग्राममध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया (Team India)मध्ये रातोरात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदलामुळं आता संघामध्ये एका खेळाडूला शेवटच्या क्षणी संधी देण्यात आली आहे. हा खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. 

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ला भारतीय संघात घेतल्यामुळं आता तो गोलंदाजीच्या बळावर संघाला किमान या सामन्यातून तरी तारतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. गेल्या बऱ्याच काळापासून संघातील महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळं अशा परिस्थितीत कुलदीप त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणार का याकडेच सर्वाचं आणि विशेष म्हणजे निवड समितीचं लक्ष असेल. ही संधी मिळण्यापूर्वी कुलदीप टी20 वर्ल्ड कप 2022 च्याही आधी दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळला होता. (IND vs BAN 3rd Odi Kuldeep Yadav added to team india latest sports news in marathi)

तीन महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), दीपक चाहर (Deepak Chahar) आणि 26 वर्षी वेगवान गोलंदाज कुलदीप सेन (Kuldeep Sen) हे तीन खेळाडू संघातून दुखापतीमुळं बाहेर झाले आहे. रोहितच्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, दीपक चाहरसुद्धा हॅमस्ट्रींगच्या त्रासामुळं संघाबाहेर आहे. कुलदीप सेन पाठीच्या दुखण्यानं त्रस्त असल्यामुळं तोसुद्धा संघात योगदान देऊ शकलेला नाही.

संघाचं कर्णधारपद कुणाला?

रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी एका नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. के.एल. राहुल याच्या खांद्यावर संघाची धुरा असणार आहे. त्यामुळं स्वत:चा खेळ सावरण्यासोबतच संघाला योग्य दिशा देणं असं दुहेरी आव्हान त्याच्यापुढे असणार आहे. तसं पाहिलं तर, त्यानं आतापर्यंत 1 कसोटी सामना, 6 एकदिवसीय सामने आणि एका टी20 सामन्याचं कर्णधारपद भूषवलं आहे. बांगलादेशविरोधातील तिसरा कसोटी सामना आता फक्त औपचारिकतेपुरताच असला तरीही, यामध्ये के.एल त्याच्या वाट्याचा आलेली जबाबदारी कशी पार पाडतो हेसुद्झधा भविष्याच्या दृष्टीनं लक्षवेधी ठरणार आहे.

हेसुद्धा वाचा : Trends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा 'हा' खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!

कशी आहे भारताली प्लेइंग 11?

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (Wicket Keeper), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.