IND vs END 5 T20 Match: सामना खेळण्यासाठी फीट नाही विराट कोहली?

कोहली पूर्णपणे निर्णायक सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Updated: Mar 20, 2021, 01:00 PM IST
IND vs END 5 T20 Match: सामना खेळण्यासाठी फीट नाही विराट कोहली?

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड आज पाचवा टी 20 सामना होत आहे. या सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चौथ्या टी 20 सामन्या दरम्यान विराट कोहलीला दुखापत झाली होती. 

चौथ्या टी 20 सामन्यामध्ये शेवटच्या 4 ओव्हरदरम्यान फील्डिंग करत असताना विराटला अचानक दुखापत झाली. त्यामुळे त्यानं मैदान सोडलं आणि कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्माकडे आली होती. 

विराट कोहली पाचव्या टी 20 सामन्यासाठी अद्याप फीट झाला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तर विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अनेक शंका उपस्थित केल्य़ा आहेत. 

कोहली पूर्णपणे निर्णायक सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, तो तंदुरुस्त असेल आणि शेवटच्या सामन्यात संघाचा नेतृत्व करणार असल्याचे कोहलीने सूचित केलं आहे. त्यामुळे सामना सुरू होण्याआधीच नेमकं काय ते कळू शकणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारत-इंग्लंड दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी केली आहे. शेवटच्या सामन्यावर विजय मिळवण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर आहे. त्यामुळे प्लेइंग इलेवनमध्ये कोणकोण असणार आणि टीम इंडियाची रणनिती काय असेल याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना आहे. शेवटचा टी 20 सामना संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.