मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पहिला टी20 सामना खेळवला जात आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले असून रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान टीम इंडिय़ा प्रथम फलंदाजी करत किती धावांचा डोंगर उभारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. जो कोरोना व्हायरसवर मात करून मैदानात परतला आहे. रोहित शर्मा कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. मात्र आता तो पुर्णपणे रिकव्हर झाला असून आता टी20 सामने खेळतोय.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही पहिल्या T20 सामन्यात खेळणार आहे. हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. कर्णधार रोहित शर्माने त्याला कॅप देऊन त्याचे संघात स्वागत केले
इंग्लंड टीम
जेसन रॉय, जोस बटलर (कॅन्डर आणि wk), डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टोपली, मॅथ्यू पार्किन्सन.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.