मुंबई: मॅच पाहण्याची क्रीझ कुणाला नाहीय प्रत्येकाला लाईव्ह मॅच आणि तीही फुकटात पाहायला मिळाली तर. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज सध्या सुरू आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. तर दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हा सामना जर तुम्हाला एकही ज्यादा पैसा खर्च न करता पाहायता येऊ शकतो. कसा ते जाणून घेऊया.
पावसामुळे पहिल्या सामन्यातील पावसा दिवस खेळता न आल्याने सामना ड्रॉ झाला. पहिल्या सामन्यात कर्णधार जो रूटने इंग्लंडसाठी सर्वाधिक 109 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या डावात खातेही उघडू शकला नाही. तर त्याची फलंदाजी पावसामुळे दुसऱ्या डावात येऊ शकली नाही. लॉर्ड्सवर, विराट कोहलीला निश्चितपणे त्याच्या बॅटने संघासाठी काही धावा करायला आवडतील. तुम्ही तुमच्या फोनवर भारत विरुद्ध इंग्लंड सामना लाईव्ह पाहू शकता.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाणार आहे. पण जर तुमच्याकडे जिओ नंबर असेल तर तुम्ही तो जिओ टीव्हीवर थेट पाहू शकता. यासाठी तुम्हाला Playstore वर जाऊन Jio TV अॅप डाउनलोड करावं लागेल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात तुमचा जिओ नंबर अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्ही सहजपणे विनामूल्य थेट सामन्याचा आनंद घेऊ शकता.
दुसऱ्या कसोटी सामन्यात एक बदल होण्याची शक्यता. चेतेश्वर पुजारा ऐवजी हनुमा विहारीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर सूर्यकुमार आणि पृथ्वीला कधी संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. इंग्लंड विरुद्ध सीरिजच्या सुरुवातीलाच यावेळी जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली आहे. या सीरिजकडे सर्वांच लक्ष असून आता टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.