मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 3 वन डे सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1अशी बरोबरी साधली आहे. तर तिसरा सामना काँटे की टक्कर असणार आहे. मालिकेवर विजय मिळवायचा असेल तर टीम इंडियाला तिसरा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीचं नियोजन आणि मास्टरप्लॅन तयार करण्याचं काम सुरू आहे.
भारतीय माजी क्रिकेटर वसीम जाफर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. दुसरा वन डे सामना भारताच्या हातून निसटल्यानंतर त्यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी तिसरा वन डे सामना जिंकण्यासाठी काय करायला हवं हे अत्यंत सूचक पद्धतीनं सांगितलं आहे. थोडक्यात सांगायचं तर वसीम जाफर यांनी कोहलीला विजयाचा मार्ग दाखवला आहे.
Good morning @imVkohli a photo to brighten up your morning. And yes, good luck for the game tomorrow #INDvsENG #decode pic.twitter.com/Vyfl7f24u1
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 27, 2021
वसीम जाफरनं केलेल्या ट्वीटवरून असं लक्षात येत आहे की युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरला संघात समाविष्ट करून घेण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. प्लेइंग इलेवनमध्ये या दोघांना समाविष्ट करून घेण्याचे सूचक संकेत या फोटोमधून दिले आहेत.
विराट कोहली कुलदीप यादवला प्लेइंग इलेवनमधून सुट्टी देणार का? कृणाल पांड्याचं तिसऱ्या वन डेमध्ये स्थान डळमळीत होणार का? युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वन डे सामना 28 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता पुण्यात खेळवण्यात येणार आहे.