INDvsENG: तिसऱ्या कसोटीसाठी विराटची पावरफुल तयारी, शेअर केला PHOTO

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जीममधील फोटो शेअर केला आहे.

Updated: Feb 20, 2021, 04:24 PM IST
INDvsENG: तिसऱ्या कसोटीसाठी विराटची पावरफुल तयारी, शेअर केला PHOTO

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने नुकतेच पार पडले. या सामन्यात भारतानं इंग्लंडसोबत 1-1 अशी बरोबरी केली आहे. तिसरा आणि चौथा सामना हा अहमदाबादमधील चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ चेपॉकवर पोहोचले आहेत.

तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. ज्याची टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आधीच तयारी सुरू केली आहे.  इंग्लंडला पुन्हा धूळ चारण्यासाठी आता कोणतीही कमी न सोडण्याचा निर्धार कर्णधार विराट कोहलीनं केला आहे.

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जीममधील फोटो शेअर केला आहे. विराट या फोटोमध्ये व्यायाम करताना दिसत आहे. सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. विराट कोहली त्याच्या फिटनेसकडे पहिल्यापासूनच खूप लक्ष देतो हे सर्वांनाच माहिती आहे.

विराट कोहलीचा पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावा काढण्यात विशेष यश मिळालं नसलं तर कर्णधार विराट सेनाला दुसरा सामना जिंकण्यात मोठं यश मिळालं आहे. उर्वरित दोन सामने खेळण्यासाठी विराटसेना सज्ज आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे अश्विन, कुलदीप यादव, पंड्याचा जीममध्ये डान्स करतानाचा आनंदी असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना विराट कोहलीच्या वर्कआऊटही चर्चेत आला आहे.

 

 

 

 

Tags: