मॅचच्याआधी लेडीज परफ्यूम लावतो Ben Stokes, कारण ऐकून व्हाल हैराण

 सामन्यापूर्वी बेन स्टोक्स महिला परफ्यूम लावतो 

Updated: Mar 28, 2021, 12:03 PM IST
मॅचच्याआधी लेडीज परफ्यूम लावतो Ben Stokes, कारण ऐकून व्हाल हैराण

नवी दिल्ली: इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्सने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या वनडे सामन्यात 99 धावांची शानदार खेळी केली. स्टोक्सचे शतक एक रन्सने हुकले पण त्याने आपला संघ जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. दरम्यान, स्टोक्सने आणखी एक मोठा खुलासा केलाय. सामन्यापूर्वी तो महिला परफ्यूम लावतो असे स्टोक्सने म्हटले आहे.

सामन्यापूर्वी स्टोक्स (Ben Stokes) महिला परफ्यूमचा वापर का करतो ? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर एक अतिशय मजेशीर उत्तर त्याने दिले. रेडिओ स्टेशन टॉक स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. महिला परफ्यूम पुरुषांपेक्षा अधिक सुगंध देतो. एवढेच नव्हे तर असे करणारा तो एकटा खेळाडू नाहीय तर पूर्ण टीम असं करते असे स्टोक म्हणाला. डाळिंबाच्या अत्तराचा डियोड्रंड आपल्या आवडता असल्याचे तो म्हणाला. 

दुसर्‍या वनडेत 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला सलामीवीर जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकात रॉय 55 धावा करुन परतला.

रॉय आऊट झाल्यानंतर बेयरस्टोला बेन स्टोक्सने साथ दिली. बेअरस्टोने 124 धावांची शानदार खेळी केली. स्टोक्सने 99 धावा केल्या पण त्याचे शतक थोडक्यात हुकले.

आज निर्णायक सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG)मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामन आज खेळवला जाणार आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 66 धावांनी विजय मिळविला, त्यानंतर इंग्लंडने पुनरागमन करत दुसरा सामना 6 विकेट्सने जिंकला. आज दोन्ही टीमसाठी निर्णायक सामना असणार आहे. भारताने यापूर्वी कसोटी आणि टी -20 मालिका आपल्या खिशात टाकली आहे.