मुंबई : दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने 170 धावा केल्या आहेत. रोहीतने 31 धावा आणि रवींद्र जडेजाच्या 46 धावाच्या बळावर टीम इंडीयाने 170 धावा ठोकल्या आहेत. आता इंग्लंडसमोर 171 धावांचे लक्ष्य असणार आहे. इंग्लंडकडून क्रिस जॉर्डनने 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट घेतल्या आहेत.
दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली होती. रोहीतने 31 तर ऋषभने 26 धावा ठोकल्या आहेत. या दोघांच्या विकेटनंतर भारतीय फलंदाजी गडगडली आहे. एका मागून एक फलंदाज विकेट देत पव्हेलियन गाठत आहेत. विराट कोहली 1, सुर्यकुमार यादव 15, हार्दीक पंड्या 12, दिनेश कार्तिक 12, हर्षल पटेल 13, रविंद्र जडेजा 46 धावा केल्या आहेत.
रवींद्र जडेजाने मोक्याच्या क्षणी येऊन डाव सावरल्याने टीम इंडिया 170 धावांचा टप्पा गाठू शकली. रवींद्र जडेजा 46 धावा केल्या. या खेळीत त्याने पाच फोर मारले. दरम्यान इंग्लंड संघातून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसन 3 विकेट तर क्रिस जॉर्डनने 4 विकेट घेतल्या आहेत.