3 वेळा नापास खेळात मिळवलं यश, क्रिकेटसाठी सरकारी नोकरीकडेही फिरवली पाठ

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वन डे सामन्यात कृणालनं दमदार डेब्यू केलं. त्यानं आपली कामगिरी चोख आणि यशस्वीरित्या पार पडली. 

Updated: Mar 24, 2021, 04:03 PM IST
3 वेळा नापास खेळात मिळवलं यश, क्रिकेटसाठी सरकारी नोकरीकडेही फिरवली पाठ

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वन डे सामन्यात कृणालनं दमदार डेब्यू केलं. त्यानं आपली कामगिरी चोख आणि यशस्वीरित्या पार पडली. कृणालचं डेब्यू चांगलंच चर्चेत राहिलं आहे. टीम इंडियाच्या विजयासोबतच आज कृणाल आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. 30 व्या वाढदिवसानिमित्तानं कृणालबद्द काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. 

कृणालनं पहिल्या वन डे सामन्यातून डेब्यू केलं. यावेळी आपल्या वेगवान फलंदाजीनं 58 धावा केल्या. कमी चेंडूमध्ये जास्त धावा करण्याचा विक्रम कृणालनं केला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्सचा महत्त्वपूर्ण खेळाडू कृणालच्या आयुष्यातही अनेक चढ उतार आले. त्याने त्यावर यशस्वीपणे मात करत क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं आणि त्याला यश मिळालं. 

क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार शाळा संपली की मी आणि हार्दीक दोघंही ग्राऊंडवर खेळायला जायचो. मी तर दहावीला तीन वेळा नापास झालो आहे. पण मी सहजासहजी हार मानली नाही. मी पुन्हा परीक्षा दिली मी कॉलेजही माझं पूर्ण केलं. मला एका सरकारी नोकरीची ऑफरही आली होती असा खुलासा त्याने कृणाल पांड्याने स्वत: केला आहे. आज त्या एका निर्णयानं माझं आयुष्य़ बदललं आहे. 

दीड ते दोन वर्ष मी क्रिकेटचा सराव करत होते ते एका सरकारी नोकरीसाठी नाही. त्यावेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड सुरू होती. ह्या सामन्यात उतरण्याचा निर्णय घेतला आणि मी नोकरीचं मिळालेलं ऑफर लेटर फाडून टाकलं.

कृणालच्या क्रिकेटच्या कारकीर्दीमध्ये वडिलांचा मोठा वाटा आहे. माझ्या 6 व्या वर्षातच माझ्या वडिलांनी माझ्यातली कला ओळखली होती. त्यावेळी आम्ही सुरतमध्ये राहत होतो. वडिलांनी वडोदराला जाण्याचा निर्णय घेतला. इतक्या लहान वयात त्यांनी माझ्या कौशल्याचा विचार करू हा निर्णय घेतल्याचं सांगत कृणाल भावुक झाला होता. डेब्यूमध्ये कृणाल पांड्यानं 26 चेंडूमध्ये अर्धशतक केलं.