मुंबई : इंग्लंडविरूद्धचा पहिला T20 सामना टीम इंडियाने तुफानी पद्धतीने जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा 50 रन्सनी पराभव केला. दुसरा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाला मालिका 2-0 ने जिंकायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तो अनेक फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
जवळपास रोहित शर्मा आणि इशान किशन ही ओपनिंग जोडी असल्याची दाट शक्यता आहे. इशान किशनने मागच्या सामन्यात नावाप्रमाणे कामगिरी केली नाही, पण तो एक चांगला खेळाडू आहे. त्याचवेळी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. यामध्ये दिपक हुड्डाला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
मिडल ऑर्डरमध्ये चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. त्याचवेळी हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकासाठी जागा मिळण्याची शक्यता आहे. हार्दिकने पहिल्या टी-20 सामन्यात तुफानी खेळ दाखवला. हार्दिक एक असा खेळाडू आहे जो अवघ्या काही बॉलमध्ये सामन्याचं रूप पालटू शकतो. त्याचबरोबर ऋषभ पंतकडे विकेटकिपींगची जबाबदारी देण्यात येईल.
इंग्लंडच्या मैदानावरील पिट नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरलंय. यासाठी भारताकडे भुवनेश्वर कुमार, हर्षल आणि जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज आहेत. त्याचबरोबर युझवेंद्र चहल फिरकीची जबाबदारी देण्यात येईल. रवींद्र जडेजाचा टीममध्ये समावेश केला जाईल.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि रवींद्र जडेजा