विराटचा एक दिवस खराब जावा, 'या' दिग्गज खेळाडूचा 'माइंड गेम'!

आता कुठे फॉर्ममध्ये नाही आला तर दिग्गजाने लावली 'पनवती'  

Updated: Nov 8, 2022, 08:03 PM IST
विराटचा एक दिवस खराब जावा, 'या' दिग्गज खेळाडूचा 'माइंड गेम'! title=

Ind vs Eng : टी-20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने धडक मारली आहे. 10 नोव्हेंबरला इंग्लंडसोबत भारताचा सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. आशिया कपमध्ये धावांसाठी संघर्ष करणाऱ्या कोहलीने या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. ज्यावेळी कोहली फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा प्रत्येकालाच वाटत होतं की कोहलीने पहिल्यासारखं खेळावं. (Ind vs Eng Virat had a bad day former England player Kevin Pietersen Sport Marathi news)

इंग्लंडचा दिग्गज माजी खेळाडूने कोहलीने फॉर्ममध्ये यावं असं म्हटलं होतंं मात्र आता कोहली गेमचेंजर ठरताना दिसत आहे. तोच दिग्गज खेळाडू कोहलीबाबत बोलताना माइंडगेम करताना दिसत आहे. आधी कोहलीने लवकरात लवकर फॉर्ममध्ये यावं यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. आता इंग्लंडसोबत भारताचा सामना आहे तर कोहलीचा एक दिवस खराब जावा असं म्हणत आहे. 
 
इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने एका ॲपसाठी लिहिताना  आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, कोहली फॉर्मात नसताना मी त्याला पाठिंबा दिला होता. तो एक दर्जेदार मनोरंजन करणारा खेळाडू आहे, त्याला गर्दीची गरज असते. गेल्या काही वर्षांमागे त्याने फॉर्म गमावला होता. ज्या गर्दीची आणि उत्साहाची गरज होती तशा प्रकारचं स्टेज ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकामध्ये भेटलं आहे. मी आनंदी आहे मात्र गुरूवारी त्याचा एक दिवस खराब जावा, असं केविन पीटरसनने म्हटलं आहे. 

दरम्यान, भारताचा इंग्लंडसोबत 10 नोव्हेंबरला सेमी फायनलचा सामना होणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये पहिला सेमी फायनलचा सामना होणार आहे. भारताला आता फक्त दोन सामने जिंकायचे आहेत त्यानंतर टी-20 वर्ल्ड कपची चकचकती ट्रॉफी भारताकडे असेल. मात्र हे दोन सामने भारताला जिंकणं जड जाणार आहे.