मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 2nd Test) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येत आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) विश्रांतीनंतर दुसऱ्या सामन्यात संघासोबत जोडला गेला. मात्र विराटला फील्ड आणि थर्ड अंपायर्सच्या (Third Umpire) वादग्रस्त निर्णयाचा फटका बसला. पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे विराटला भोपळाही फोडता आला नाही. विराटला शून्यावर एलबीडबल्यू आऊट (Virat Out) असल्याचं घोषित केलं. या निर्णायवरुन पंचांवर जोरदार टीका केली जात आहे. (ind vs nz 2nd test 1st day field umpier anil choudahry and third umpire virender sharma captain virat kohli lbw controversial decision on azaz patel bowling)
नक्की काय झालं?
हा सर्व प्रकार टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यानच्या 30 व्या ओव्हरमध्ये घडला. अझाज पटेल (Azaz Patel) ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्ये शेवटच्या चेंडूवर एझाजने एलबीडबल्यूची जोरदार अपील केली. फील्ड अंपायर अनिल चौधरीने (Anil Choudahry) विराटला बाद घोषित केलं. विराटने या निर्णायला आव्हान देL रिवीव्ह्यू घेतला. आता विराट आऊट आहे की नाही हे थर्ड अंपायर (Third Umpire Virender Sharma) वीरेंद्र शर्मा सांगणार होते.
बॉल आधी बॅटला लागला. त्यानंतर जाऊन पॅडला लागला. थर्ड अंपायरने आवश्यक तेवढा वेळ घेतला. त्यांनी दिलेला निर्णय हा धक्कादायक होता. कॉमेंटटरनाही या निर्णायामुळे धक्का बसला. फिल्ड अंपायरने दिलेला निर्णय थर्ड अंपायरनेही कायम ठेवत विराटला बाद ठरवंलं. यानंतर विराट फिल्ड अंपायरच्या दिशेने गेला. दोघांनी फार चर्चा केली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. विराटने अखेर मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
थर्ड अंपायरने काय सांगितलं?
"चेंडू एकाचवेळी बॅट आणि पॅडला लागला. त्यामुळे मी निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे मी फिल्ड अंपायरने दिलेल्या निर्णायसह सहमत आहे, असं स्पष्टीकरण थर्ड अंपायर वीरेंद्र शर्माने दिलं. दरम्यान या निर्णयामुळे फिल्ड आणि थर्ड अंपायर या दोघांवर सडकून टीका केली जात आहे.
विराट कोहली आऊट
WATCH - Was Virat Kohli OUT or NOT OUT ? You decide.
Full video https://t.co/ZhDsQdLdZZ #INDvNZ @Paytm pic.twitter.com/2opNPCVoqU
— BCCI (@BCCI) December 3, 2021