IND vs NZ : टीम इंडियाचा पुन्हा लाजीरवाणा पराभव, 8 विकेट्स राखून किवीचा भारतावर विजय

पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडूनही भारताचा धुव्वा.... टीम इंडियाचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव

Updated: Oct 31, 2021, 10:27 PM IST
IND vs NZ : टीम इंडियाचा पुन्हा लाजीरवाणा पराभव,  8 विकेट्स राखून किवीचा भारतावर विजय title=

दुबई: पाकिस्तान पाठोपाठ किवी संघा विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. टीम इंडियाची दुसऱ्या सामन्यातील कामगिरी लाजीरवाणी ठरली आहे. जेमतेम टीम इंडियाच्या खेळाडूंना 110 धावा काढण्यात 20 ओवरमध्ये झाल्या. न्यूझीलंड संघाला 111 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. 

न्यूझीलंड संघाला हे आव्हान पूर्ण करणं अजिबात कठीण नव्हतं. बुमराहने आपले पूर्ण प्रयत्न केले. वरुण चक्रवर्तीला मात्र किवीच्या फलंदाजांना रोखण्यात विशेष यश आलं नाही. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 111 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडनं एक विकेट गमावत हे आव्हान सहज पार केलं. 

न्यूझीलंडकडून मिशेलनं 49 रन्सची खेळी केली. टॉस जिंकून न्यूझीलंडनं फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडच्या बॉलर्सनी भारतीय बॅट्समन्सची पुरती दाणादाण उडवली. इशान किशन, के.ए.राहूल, रोहित शर्मा, विराट कोहली ही भारताची टॉप ऑर्डर पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ऋषभ पंतलाही चांगली कामगिरी करता आली नाही. 

टीम इंडियामध्ये त्यातल्या त्यात रवींद्र जाडेजानं 26 तर हार्दिक पांड्यानं सर्वाधिक 23 रन्स करत भारताला शंभरी गाठून दिली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टनं 3 तर सोदीनं 2 विकेट्स घेतल्या. मार्टिन गुप्टीलने 3 चौकारांच्या मदतीनं 20 धावा केल्या. मिशेलनं 49 रन्सची खेळी केली. केन विल्यमसननं 32 धावा केल्या आहेत. 

या पुढचा 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा सामना होणार आहे. 5 नोव्हेंबरला स्कॉटलंड विरुद्ध सामना होणार आहे. दुबईमध्ये आधी पाकिस्तान आणि नंतर किवी संघाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे.