Ind vs Nz : दुसऱ्या टेस्टआधी कोहलीच्या वाढल्या चिंता, प्लेईंग इलेवनबाबत संभ्रम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार 3 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे.

Updated: Dec 2, 2021, 11:46 PM IST
Ind vs Nz : दुसऱ्या टेस्टआधी कोहलीच्या वाढल्या चिंता, प्लेईंग इलेवनबाबत संभ्रम

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (Ind vs Nz) यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार 3 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) सुरू होणार आहे. कानपूर येथे झालेला पहिला कसोटी सामना टीम इंडियाच्या (Team India) हातातून गेला. तो अनिर्णित ठेवण्यात किवी संघ यशस्वी झाला. आता मालिका जिंकण्यासाठी भारताला मुंबईत कोणत्याही परिस्थितीत मालिका (Test Series) जिंकावीच लागेल आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing xi) योग्य आणि संतुलित निवड करणे. 

कर्णधार विराट कोहलीचेही (Virat Kohli) संघात पुनरागमन झाले असून अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चा सुरु आहे. या सगळ्यात मुंबईत सुरू असलेल्या पावसाने (Rain In mumbai) निर्णय घेणं अधिक कठीण झाले आहे. पावसाचा विचार करून टीम इंडिया 3 स्पिनर्स किंवा 3 फास्ट बॉलर्ससोबत जाणार का? या प्रश्नाच्या उत्तरात कर्णधार कोहलीने काहीही स्पष्ट करण्यास नकार दिलाय.

कानपूर कसोटी (Kanpur test) संपेपर्यंत टीम इंडियासमोर एकच प्रश्न होता की मुंबई कसोटीत कोहलीच्या पुनरागमनामुळे प्लेइंग इलेव्हनमधून कोणत्या फलंदाजाला वगळण्यात येईल, पण मुंबईत पावसाने गोलंदाजीबाबतही अडचण निर्माण केली आहे. शेवटच्या कसोटीत भारतीय संघ 3 फिरकीपटूंसह उतरला होता आणि जवळपास स्वबळावरच विजय मिळवला होता. सामान्य परिस्थितीत मुंबई कसोटीत 3 फिरकीपटू उतरणे साहजिक होते, पण सलग 2 दिवस पाऊस आणि 3 तारखेला अशीच परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज यामुळे खेळपट्टी सतत झाकलेली असते आणि अशा परिस्थितीत, वेगवान गोलंदाजांना मदतीची अपेक्षा आहे.

3 फिरकीपटू की 3 वेगवान गोलंदाज?

अशा परिस्थितीत टीम इंडिया कोणत्या रणनीतीने जाणार? गुरुवार 2 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत कर्णधार कोहलीला हाच प्रश्न विचारण्यात आला. कोहलीने या प्रकरणी काहीही स्पष्ट करण्यास नकार दिला पण संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेऊन जाऊ शकतो असे संकेत त्याने दिले.

'हवामान बदलले आहे आणि ते लक्षात घेऊन आम्हाला संघ निवडायचा आहे. पाच दिवस असेच वातावरण राहील असे तुम्ही गृहीत धरू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेणारे कोणते बॉलिंग कॉम्बिनेशन निवडायचे ते पाहावे लागेल.'

3 फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांची जुनी रणनीती घेऊन संघ गेला, तरी बदल निश्चित असल्याचे मानले जात आहे. पहिल्या कसोटीत प्रभावी न ठरलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजचे पुनरागमन जवळपास निश्चित आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर सिराज आणि उमेश प्रभावी ठरले आहेत.

यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या फिटनेसबाबत टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी आली आहे. शेवटच्या कसोटीत साहा तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळू शकला नाही. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. साहाच्या फिटनेसबद्दल बोलताना कोहली म्हणाला, “तो सध्या तंदुरुस्त आहे. तो आता बरा झाला आहे"