मला आशा आहे की....; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा या क्रिकेट मालिकेवर परिणाम होताना दिसतोय. यावर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Dec 2, 2021, 03:41 PM IST
मला आशा आहे की....; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील टेस्टचा शेवटचा सामना उद्या रंगणार आहे. यानंतर टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा या क्रिकेट मालिकेवर परिणाम होताना दिसतोय. यावर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने आशा केली व्यक्त

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी सांगितलं की, आगामी काही दिवसांत दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत स्पष्ट चित्र समजेल अशी आशा आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनच्या आगमनानंतर सर्वत्र घबराटीचं वातावरण आहे.

कोरोनाच्या धोक्याबद्दल कोहली काय म्हणाला?

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकारांशी संवाद साधताना विराट कोहली म्हणाला, आम्ही बीसीसीआयशी बोलत आहोत. आम्हाला अधिक स्पष्टतेची गरज आहे आणि आशा आहे की येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल. राहुल द्रविड सर्व वरिष्ठ खेळाडूंशी बोलले आहेत. आम्ही कोणत्या संभ्रमात राहू नये हे महत्त्वाचं आहे.

गोष्टी सामान्य नाहीत: कोहली

विराट कोहली पुढे म्हणाला, "आम्ही सामान्य परिस्थितीत खेळत नाही. आम्ही संघातील सर्व सदस्यांशी बोललो आहोत." भारतीय वरिष्ठ संघाला 17 डिसेंबरपासून पुढील सात आठवडे दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळायचे आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2021-22 पूर्ण वेळापत्रक

पहली टेस्ट - 17 से 21 डिसेंबर
दुसरी टेस्ट - 26 से 30 डिसेंबर
तिसरी टेस्ट - 3 से 7 जानेवारी

पहली वनडे - 11 जानेवारी
दुसरी वनडे - 14 जानेवारी
तिसरी वनडे - 16 जानेवारी

पहली टी-20 - 19 जानेवारी
दुसरी टी-20 - 21 जानेवारी
तिसरा टी-20- 23 जानेवारी
चौथी टी-20- 26 जानेवारी