Ind Vs Pak: भारताच्या 'या' खेळाडूने टीम इंडिया-पाकिस्तानमधील स्पर्धा संपवली, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं मोठं विधान

भारत-पाकिस्तानमधील स्पर्धा संपवणारा 'तो' कर्णधार होता तरी कोण? पाकिस्तानचा माजी क्रिकेटर 'त्या' खेळाडूबद्दल काय म्हणाला? 

Updated: Oct 9, 2022, 01:31 PM IST
Ind Vs Pak: भारताच्या 'या' खेळाडूने टीम इंडिया-पाकिस्तानमधील स्पर्धा संपवली, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं मोठं विधान  title=

ऑस्ट्रेलिया : येत्या 16 ऑक्टोंबरपासून टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind Vs Pak) होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याआधीच वातावरण तापले.टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी टी20 वर्ल्ड कपपुर्वी (T20 World Cup) टीम इंडियाला डि़वचल्याची घटना ताजी असतानाच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने देखील मोठं विधान केलं आहे. 

 

T20 World Cup: वर्ल्ड कपमधील सामन्याआधीच भारत-पाकिस्तानमध्ये राडा,जाणून घ्या

 

भारताच्या 'या' खेळाडूबाबत काय म्हणाला?

एमएस धोनीने (Mahendra Singh Dhoni) त्याच्या कारकिर्दीत पाकिस्तानला पूर्णपणे बाजूला ठेवले होते,असे मोठं विधान शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) केले होते. एका मुलाखतीत आफ्रिदी म्हणाला की, 'जर तुम्ही भारतीय संघाकडे बघितले तर गेल्या काही वर्षांत... जेव्हा धोनीचे युग सुरू झाले तेव्हा त्याने दृष्टिकोनच बदलला. त्यांने भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संपवले होते. 

एमएस धोनी (Mahendra Singh Dhoni)  सतत जिंकत होता. त्याने त्याच्या काळात विचारसरणी बदलली होती.ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघाला हरवायला सुरुवात केली. मग त्याचा सामना फक्त त्याचं संघाशी राहायला होता. यावेळी त्याने पाकिस्तानला (Pakistan) संघाला पुर्णपणे बाजूला केले होते, असे आफ्रीदी म्हणाला होता. 

मात्र आता गोष्टी परत येत आहेत आणि आणखी येतील असे सुचक वक्तव्य देखील त्याने पाकिस्तानच्या (Pakistan) टी20 वर्ल्ड कप सामन्यापुर्वी केले आहे. 

दरम्यान टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये टीम इंडिया (Team India)  पाकिस्तानशी भि़डणार आहे. याआधी 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडियाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. 

टी-20 वर्ल्डकपसाठी संघ
टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.

पाकिस्तान संघ : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, शान मसूद, उस्मान कादिर.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद हारिस, फखर जमां आणि शाहनवाज दहानी.