Asia Cup: मोठी बातमी! विराट पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? सरावादरम्यान...

India Vs Pakistan Asia Cup 2023 Virat Kohli: भारत आणि पाकिस्तानचा संघ आज श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानामध्ये एकमेकांविरोधात खेळणार असला तरी या सामन्याआधी सरावादरम्यान घडलेल्या एका घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.  

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 2, 2023, 08:42 AM IST
Asia Cup: मोठी बातमी! विराट पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? सरावादरम्यान... title=
भारतीय संघाच्या सरावादरम्यान घडली घटना

India Vs Pakistan Asia Cup 2023 Virat Kohli: भारताचा सामना आज पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आशिया चषक स्पर्धा 2023 मधील भारताचा हा पहिलाच सामना असणार आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळच्या संघाला 238 धावांनी पराभूत करुन स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. आज श्रीलंकेतील कॅण्डीमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीयांना चिंतेत टाकाणारी एक बातमी समोर आली असून ही बातमी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसंदर्भात आहे. सामन्याच्या आदल्यादिवशी सराव करत असताना विराट जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की घडलं काय?

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2022 नंतर आता पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांविरोधात खेळणार आहे. या दोन्ही संघाचा सामना हा चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. मात्र सामन्याच्या एक दिवस आधीच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सामन्यात खेळणार की नाही याबद्दलची चर्चा दबक्या आवाजत सुरु झाली आहे. सरावादरम्यान विराट जखमी झाला आहे. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत असतानाच सराव करणाऱ्या विराटला वेगवान चेंडू लागल्याने तो जखमी झाला.

चर्चांना उधाण

चेंडू लागल्याने विराटला जखम झाली असून तो थेट सरावासाठीची खेळपट्टी सोडून बाजूला गेला. मात्र काही वेळाने सर्वकाही ठिक असल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली असली तर सामान्यपणे सराव अर्ध्यात न सोडणारा विराट अचानक बाजूला झाल्याने जखम किती गंभीर आहे याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. 

140 किमी वेग

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा 140 किलोमीटर वेगाने येणारा चेंडू विराटच्या हाताला लागला. त्यानंतर विराटने सराव थांबवला. जखम गंभीर नसली तरी विराटने अचानक सराव थांबवल्याने यात शंका घेण्यासाठी जागा असल्याचं बोललं जात आहे. विराट आणि मोहम्मद सिराज एकाच आयपीएल टीममधून मागील अनेक वर्षांपासून खेळत आहेत. त्यामुळे सिराजच्या गोलंदाजीची विराटला सवय असूनही चेंडू उसळी घेऊन प्रचंड वेगाने आल्याने विराटला तो कळला नाही आणि चेंडू थेट हाताला लागला.

पाकिस्तानी संघातील खेळाडूंची भेट

कॅण्डीच्या मैदानामध्ये सरावानंतर विराट कोहलीने पाकिस्तानी संघातील खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला मिठीही मारली. टी-20 विश्वचषकाच्या सामन्याने विराटने सरळ रेषेत हारिस रौफला षटकार लगावला होता. हा षटकार आजही चर्चेत आहे. विराटने हारिसबरोबरच शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि इतर पाकिस्तानी खेळाडूंनाही भेटला.