IND vs SA 2nd T20I : सुर्यकुमार, राहूलचं शानदार अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेसमोर इतक्या धावांचे आव्हान

टीम इंडियाने उभारला इतक्या धावांचा डोंगर, दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी इतक्या धावांचे आव्हान

Updated: Oct 2, 2022, 09:00 PM IST
IND vs SA 2nd T20I : सुर्यकुमार, राहूलचं शानदार अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेसमोर इतक्या धावांचे आव्हान title=

गुवाहाटी : दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार बॅटींगच प्रदर्शन केलं आहे. या शानदार बॅटींगच्या बळावर टीम इंडियाने 237 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे आव्हान असणार आहे. आता हे आव्हान पुर्ण करून दक्षिण आफ्रिका आपला पहिला सामना जिंकते की, टीम इंडिया ही मालिका खिशात घालते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

दक्षिण आफ्रिकेने ट़ॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीस उतरली होती.कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहूल सलामीला उतरले होते. यावेळी टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा 43 धावा करून बाद झाला, त्याने 7 फोर आणि 1 सिक्स मारला होता. तर के एल राहूलने 28 बॉल 57 रन्स केल्या. या त्याच्या खेळीत त्याने 5 फोर 4  सिक्स मारले. 

IND VS SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना विश्रांती

या सामन्यात सुर्यकूमार यादवची बॅट चांगलीच तळपली होती त्याने 22 बॉलमध्ये 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 सिक्स आणि 5 फोर मारले आहेत. तर विराट कोहलीने देखील ताबडतोड बॅटींग केली. त्याने 28 बॉलमध्ये 49 रन्स केले. या खेळीत त्याने 7 फोर आणि 1 सिक्स मारला होता. तर सुर्यकूमार यादवच्या विकेटनंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकने देखील तुफान फटकेबाजी केली. त्याने 7  ब़ॉलमध्ये 17 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 फोर आणि 2 सिक्स मारले. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 237 धावांचा डोंगर उभारला होता.

दरम्यान आता दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेन हे आव्हान पुर्ण केल्यास ते मालिकेत बरोबरी साधतील. तर टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास ते मालिका खिशात घालतील.