मुंबई: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेत भारत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सातत्याने फ्लॉप होत आहे. अशा स्थितीत पंतऐवजी संजू सॅमसनला संघात संधी देण्याची चर्चा आहे. पण कपिल देव यांचे सॅमसनबद्दलचे मत जगापेक्षा वेगळे आहे.
ऋषभ पंत, इशान किशन, ऋद्धिमान साहा आणि संजू सॅमसन यापैकी सर्वोत्तम यष्टिरक्षक कोण? असा प्रश्न कपिल देव यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, जर तुम्ही कार्तिक-इशान आणि संजूबद्दल बोलले तर ते सर्व समान पातळीवरचे आहेत. तिघांचीही फलंदाजीची पद्धत वेगळी आहे, पण जर कोणता यष्टीरक्षक सर्वोत्कृष्ट फलंदाज सांगायचं तर तो म्हणजे वृध्दिमान साहा.
कपिल देव यांनी संजू सॅमसनवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कपिल देव म्हणाले, 'फलंदाजीच्या दृष्टिकोनातून सगळे एकमेकांसाठी समान आहेत. जेव्हा त्यांचा दिवस असतो तेव्हा कोणीही चमत्कार करू शकतो. पण संजू सॅमसनमुळे मी खूप निराश झालो आहे. त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे पण तो एक-दोन सामन्यात अप्रतिम खेळतो आणि नंतर अपयशी ठरतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. मात्र, आयपीएल 2022 मध्ये सॅमसनची कामगिरी चांगली होती. सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र या संघाला अंतिम फेरीत गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.