Rohit Sharma | कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचा विक्रम, पण नकोसा

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs SL 1St Test) खेळवण्यात येत आहे.    

Updated: Mar 4, 2022, 04:06 PM IST
Rohit Sharma | कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचा विक्रम, पण नकोसा title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs SL 1St Test) खेळवण्यात येत आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma)  या सामन्यापासून कॅप्टन (Team India Captain) म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली. रोहितने कॅप्टन होताच विक्रम आपल्या नाववर केला आहे. रोहितने केलेला हा रेकॉर्ड इतर कोणताही खेळाडू भविष्याचत ब्रेक करण्याचा प्रयत्नही करणार नाही. (ind vs sl 1st test team india new captain rohit sharma set bad record in his captaincy debut at mohali)

काय आहे रेकॉर्ड?  

रोहितने नकोशा असलेला विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित टीम इंडियाचा 35 वा कसोटी कर्णधार ठरलाय. रोहित गेल्या 60 वर्षांमधील टीम इंडियाचा दुसरा वयस्कर कर्णधार ठरला आहे. रोहितने वयाच्या 34 वर्ष 308 व्या दिवशी कॅप्टन्सीची अधिकृतरित्या जबाबदारी स्वीकारली. 

याबाबतीत अनिल कुंबळे (Anil Kumble) टीम इंडियाचा सर्वात वयस्कर कर्णधार राहिला आहे. कुंबळे वयाच्या 37 वर्ष 36 व्या दिवशी कॅप्टन झाला होता.

आकडेवारी कोणाच्या बाजूने?

उभयसंघात 1982 पासून कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेने आतापर्यंत टीम इंडियात एकूण 20 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडिया श्रीलंकावर वरचढ राहिली आहे.  

टीम इंडियाने 20 पैकी 11 सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. तर 9 सामने अनिर्णित राखण्यात यश आले आहे. त्यामुळे श्रीलंकेची भारतातील कसोटी विजयाची पाटी अजूनही कोरीच आहे. 

त्यामुळे रोहित शर्मा आपल्या कॅप्टन्सीचा पदार्पणात टीम इंडियाला विजय मिळवून देणार की श्रीलंका पहिल्या विजयाची नोंद करणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव आणि मोहम्मद शमी.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन :  दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, विश्व फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा.