चहरच्या कहरनंतर श्रीलंकेचा संताप, मैदानात भिडले टीमचे कोच आणि कर्णधार

श्रीलंकेच्या हातून विजय निसटल्यानंतर टीमचे कोच आणि कर्णधार मैदानात भिडल्याचे दिसले. 

Updated: Jul 21, 2021, 06:25 PM IST
चहरच्या कहरनंतर श्रीलंकेचा संताप, मैदानात भिडले टीमचे कोच आणि कर्णधार

मुंबई: टीम इंडियाची सीनियर टीम इंग्लंड दौऱ्यावर असताना B टीमने श्रीलंकेत कहर केला आहे. आपल्या तुफान कामगिरीनं सर्वांची मन जिंकली. दीपक चहरने तर सामन्यात कहर केला. 82 चेंडूमध्ये 69 धावा करत त्याने टीम इंडियाला सामना जिंकवून दिला. अतितटीच्या लढतीमध्ये श्रीलंकेच्या तोंडातून त्याने विजय खेचून आणला. वन डे सीरिजमध्ये सलग दोन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. 

श्रीलंकेच्या हातून विजय निसटल्यानंतर टीमचे कोच आणि कर्णधार मैदानात भिडल्याचे दिसले. या घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. श्रीलंकेचे हेड कोच मिकी आर्थर पराभवानंतर खूप संतापले. मिकी आर्थर आणि कर्णधार दासुन शनाका मैदानात आमनेसामने येऊन वाद घालत होते. दीपक चहर आणि भुवीने श्रीलंकेच्या हातून हा विजय खेचून आणला. 

श्रीलंका टीमचे हेड कोच आणि कर्णधार मैदानात भिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना युझर्सनी कोचच्या वागणुकीवर टीका केली आहे. हा कोच रस्त्यावरच्या कोचसारखं वागत असल्याचं युझर्सचं म्हणणं आहे. तर भारतीय चाहते आणि टीम इंडियाच्या सीनियर टीमने B टीमची पाठ थोपटली आहे.

मिकी ऑर्थरच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. पूर्व दिग्‍गज रसेल आर्नोल्‍ड यांच्या म्हणण्यानुसार आर्थर आणि टीमचा कोच ड्रेसिंग रूममध्ये देखील यासंदर्भात चर्चा करू शकले असते. मात्र त्यांच्य़ा वागणुकीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर मैदानातील हा श्रीलंकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.