ind vs sl 2nd test | टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर 238 धावांनी शानदार विजय , मालिकाही जिंकली

टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

Updated: Mar 14, 2022, 06:15 PM IST
ind vs sl 2nd test | टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर 238 धावांनी शानदार विजय , मालिकाही जिंकली title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात (ind vs sl 2nd test) तिसऱ्याच दिवशी 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. मात्र श्रीलंकेचा 59.3 ओव्हर्समध्ये 208 धावांवर डाव आटोपला. (ind vs sl 2nd test day 3 team india win by 238 runs and win the series 2 0 at m chinnaswamy stadium bengaluru)

लंककेडून कर्णधार दिमुख करुणारत्ने सर्वाधिक 107 धावांची एकाकी झुंज दिली. तर कुसल मेंडिसने 54 धावा केल्या. या व्यतिरिक्त लंकेच्या एकाही फलंदाजाला विशेष असं काही करता आलं नाही. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर अक्षर पटेलने 2 विकेट्स मिळवल्या. तर अक्षर पटेलने एकमेव बळी घेतला.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.