कुंबळेने कोहलीला दिला असं गिफ्ट, आता जडेजा-अश्विनला टेन्शन

 वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५० धावा देऊन तीन विकेट घेतल्या.  भारताच्या ८२ वर्षांच्या टेस्ट इतिहासात कुलदीप हा पहिला चायनामन गोलंदाज आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 27, 2017, 05:48 PM IST
 कुंबळेने कोहलीला दिला असं गिफ्ट, आता जडेजा-अश्विनला टेन्शन title=

नवी दिल्ली :  वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५० धावा देऊन तीन विकेट घेतल्या.  भारताच्या ८२ वर्षांच्या टेस्ट इतिहासात कुलदीप हा पहिला चायनामन गोलंदाज आहे. 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध टेस्टमध्ये डेब्यू करणाऱ्या कुलदीपने चार विकेट घेतल्या होत्या. या जादूगारने या पूर्वी अंडर १९मध्ये हॅट्ट्रीक घेतली. तेव्हा राहुल द्रवीडने त्याची प्रशंसा केली होती. 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कुलदीपला संघात घ्यावे यासाठी कुंबळेने शिफारस केली होती. पण कप्तान विराट कोहलीने कुलदीप ऐवजी रवींद्र जडेजा आणि आर. अश्विनला प्लेइंग इलेवनमध्ये स्थान देण्यात आले. 

अश्विन आणि जडेजाला धोका...

गेल्या काही दिवसांपासून रवींद्र जडेजा आणि अश्विनच्या गोलंदाजीत धार राहिली नाही. जडेजा आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याची कामगिरी ठिकठाक होती. अश्विनने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये साधारण गोलंदाजी केली. त्याला अखेरच्या दोन सामन्यात खेळविण्यावर विरोध करण्यात आला.  कुलदीपच्या संघातील स्थानाने अश्विन आणि जडेजाच्या संघातील स्थान धोक्यात आले आहे. 

अश्विनची गोलंदाजी आता अनेकांना माहीत झाली आहे. त्यामुळे असा एक गोलंदाज हवा ज्याची गोलंदाजी कोणी खेळली नाही. त्याची कमतरता कुलदीप पूर्ण करू शकतो. त्याची चायनामन गोलंदाजी भारतासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होईल. विशेष करून आगामी इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी कुलदीप हुकुमाचा एक्का ठरण्याची शक्यता आहे.