दोनच दिवसात विलियम्सकडून विराटचा बदला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली टी-२० सीरिज रोमांचक झाली आहे.

Updated: Dec 9, 2019, 04:47 PM IST
दोनच दिवसात विलियम्सकडून विराटचा बदला

तिरुवनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली टी-२० सीरिज रोमांचक झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये विजय मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ३ टी-२० मॅचची सीरिज आता १-१ने बरोबरीत आहे. बुधवारी ११ तारखेला मुंबईत होणारी तिसरी टी-२० मॅच या सीरिजचा निकाल ठरवणार आहे.

या सीरिजमध्ये खेळाडूंमध्येही जोरदार सामना रंगताना पाहायला मिळत आहे. विराटने पहिल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर केसरिक विलियम्सला तीन सिक्स मारले. यानंतर विराटने नोटबूक सेलिब्रेशन केलं. २०१७ साली जमैकामध्ये विलियम्सने विराटची विकेट घेतली होती. ही विकेट घेतल्यानंतर विलियम्सने वहीमध्ये लिहायची नक्कल करत सेलिब्रेशन केलं होतं. यानंतर विराटनेही विलियम्सच्या पद्धतीनेच वहीमध्ये लिहायची नक्कल करुन हिशोब चुकता केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You do not mess with the Skip! #TeamIndia #INDvWI @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

आता दुसऱ्या टी-२०मध्ये विलियम्सने विराट कोहलीची विकेट घेतली. विराटची विकेट घेतल्यानंतर विलियम्सने सेलिब्रेशन केलं नाही. तर तोंडावर बोट ठेवून विराटला गप्प राहण्याचा इशारा केला. विलियम्सच्या या इशाऱ्यानंतर स्टेडियममध्ये काही काळ शांतता पसरली.