IND vs ZIM: 'या' मराठमोळ्या खेळाडूला Playing 11 मध्ये स्थान देत नाहीये KL Rahul!

दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर केएल राहुलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका स्टार खेळाडूचा समावेश नव्हता.

Updated: Aug 20, 2022, 08:32 AM IST
IND vs ZIM: 'या' मराठमोळ्या खेळाडूला Playing 11 मध्ये स्थान देत नाहीये KL Rahul! title=

मुंबई : टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतेय. टीम इंडियाने पहिला वनडे सामना अतिशय धमाकेदार शैलीत जिंकला. दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर केएल राहुलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका स्टार खेळाडूचा समावेश नव्हता. मुख्य म्हणजे हा खेळाडू अवघ्या काही बॉल्समध्ये सामन्याचं चित्र बदलण्यात पटाईत आहे. 

मराठमोळ्या खेळाडूला संधी नाही

शार्दुल ठाकूरचा झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडिया समावेश करण्यात आला होता. पण हा स्टार खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडतोय. अवघ्या काही बॉल्समध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता शार्दुलकडे आहे. 

शार्दुल त्याच्या बॉलिंग आणि धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकलेत. 

शार्दुल ठाकूर गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डींग या तिन्ही ठिकाणी फॉर्मेटमध्ये खेळू शकतो. शार्दुल ठाकूरचा आशिया चषकासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत झिम्बाब्वे दौऱ्यावर निवड समितीवर प्रभाव टाकून तो टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा भाग बनू शकला असता, पण कर्णधार केएल राहुल त्याला टीम इंडियामध्ये संधी देऊ इच्छित नाही.

दीपक-हार्दिक प्रमाणे शार्दूल धोकादायक

दीपक चहर आणि हार्दिक पांड्याप्रमाणे शार्दुल ठाकूरकडे भारताला सामने जिंकून देण्याची कला आहे. त्याच्याकडे अफाट प्रतिभा आहे, जी टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला जात नाहीये.