भारत-अफगाणिस्तान टेस्टमध्ये पुन्हा पावसाचा खेळ

भारत-अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात

Updated: Jun 14, 2018, 03:44 PM IST
भारत-अफगाणिस्तान टेस्टमध्ये पुन्हा पावसाचा खेळ title=

बंगळुरू : भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे. पण या मॅचमध्ये पुन्हा पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताचा स्कोअर 264/1 एवढा आहे. मुरली विजय 99 रनवर नाबाद तर लोकेश राहुल नाबाद 44 रनवर खेळत आहे. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि मुरली विजयनं भारताला जबरदस्त सुरुवात करुन दिली.

पहिल्याच सत्रामध्ये शिखर धवननं त्याचं शतक पूर्ण केलं. धवनची नाबाद 104 रन आणि विजयच्या नाबाद 41 रनमुळे भारतानं पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता 158 रन केले होते. पहिल्या सत्रानंतर मात्र शिखर धवन आऊट झाला. धवननं 96 बॉलमध्ये 107 रन केले. धवनच्या खेळीत 19 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर यामीन अहमदजईच्या बॉलिंगवर मोहम्मद नबीनं स्लिपमध्ये धवनचा कॅच पकडला.

शिखर धवननं आत्तापर्यंत 30 मॅचच्या 50 इनिंगमध्ये 43.84 च्या सरासरीनं 2,153 रन केल्या आहेत. यामध्ये 7 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. अफगाणिस्तानची टेस्ट क्रिकेटमधली शिखर धवन ही पहिली विकेट ठरला आहे.