कुस्तीपटू अमन सेहरावतने पटकावले कांस्य पदक; भारताने जिंकले सहावे पदक

कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 9, 2024, 11:42 PM IST
कुस्तीपटू अमन सेहरावतने पटकावले कांस्य पदक; भारताने जिंकले सहावे पदक title=

Aman Sehrawat: भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने  कांस्य पदक पटकावले आहे. अमन सेहरावतने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहावे पदक जिंकून दिले आहे. अमन सेहरावतने 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे. प्युएर्टो रिको देशाच्या डॅरियन क्रुझ याच्याची अमन सेहरावत लढत झाली. 

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने सिल्वर मेडल जिंकत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील 5वे पदक मिळवून दिलंय. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 89.45 मीटर थ्रो करत सिल्वर मेडल मिळवले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिले रौप्य पदक ठरले. नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी 4 थ्रो फाऊल गेले. पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये 89 मीटरचा टप्पा गाठला. तर अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे.