कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड

भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.

Shubhangi Palve Updated: Apr 9, 2018, 05:09 PM IST
कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड title=

गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.

फायनलची पहिली मॅच एकेरी होती. इथं अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमल हिनं पहिला डाव ४-११ असा हरल्यानंतर पुन्हा जोरदार वापसी करत बोडे अमियोडूनला पुढच्या तीन डावांत ११-५, ११-४ आणि ११-९ अशी मात देऊन १-०नं भारताला पुढे आणलं.

दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या साथियान गणासेकरनलाही पहिल्या डावात १०-१२ नं पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, त्यानंही मॅचमध्ये शानदार वापसी करत पुढच्या तीन गेम्समध्ये ११-३, ११-३, ११-४ नं जिंकून भारताल दुसरा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी दिली. 

यानंतर तिसरी मॅच दुहेरी होती. या मॅचमध्ये हरमीत देसाई आणि साथियान गमासेकरननं नायजेरियाच्या ओलाजीडे ओमोटायो आणि बोडे अमियोडून यांच्या जोडीला ११-८, ११-५, ११-३ अशा फरकानं पछाडलं. 

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं हे नववं सुवर्ण पदक आहे. तर, पाचव्या दिवसातलं भारताचं हे सहावं पदक आहे.  दिवसातलं पहिलं गोल्ड जीतू रायनं निशानेबाजीत पटकावलं.