आयपीएल सुरु व्हायच्या आधीच चेन्नईला धक्का, हा मोहरा दुखापतीमुळे बाहेर

आयपीएलचा अकरावा मोसम ७ एप्रिलपासून सुरु होणार आहे.

Shreyas deshpande Updated: Mar 14, 2018, 05:30 PM IST
आयपीएल सुरु व्हायच्या आधीच चेन्नईला धक्का, हा मोहरा दुखापतीमुळे बाहेर  title=

मुंबई : आयपीएलचा अकरावा मोसम ७ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या मोसमातला पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण आयपीएल सुरु व्हायच्या आधीच चेन्नई सुपरकिंग्जला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्पिनर मिचेल सॅण्टनर दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकणार नाही. सॅण्टनरच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे सॅण्टनर पुढचे ९ महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. यामुळे सॅण्टनर आगामी इंग्लडविरुद्धच्या टेस्ट सीरिजलाही मुकणार आहे.

मिचेल सॅण्टनरची दुखापत हा चेन्नईला मोठा धक्का मानला जात आहे. चेन्नईनं आर. अश्विनला रिटेन केलं नाही तसंच लिलावावेळीही त्याच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरु दिलं नाही. अश्विन आता किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे. पंजाबनं अश्विनची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. 

यंदाच्या मोसमामध्ये चेन्नईसाठी सॅण्टनर अश्विनची भूमिका बजावेल, असं बोललं जात होतं पण आता स्पिनरची कमी चेन्नईला भासू शकते. सॅण्टनरबरोबर हरभजन सिंगला चेन्नईनं टीममध्ये घेतलं होतं. आता हरभजन सिंगला चेन्नईचा प्रमुख स्पिनर म्हणून भूमिका बजावावी लागणार आहे.

अशी आहे चेन्नईची टीम

महेंद्रसिंग धोनी- ३६ वर्ष

सुरेश रैना- ३१ वर्ष

फॅप डुप्लेसिस- ३३ वर्ष

हरभजन सिंग- ३७ वर्ष

ड्वॅन ब्राव्हो- ३४ वर्ष

शेन वॉटसन- ३६ वर्ष

केदार जाधव- ३२ वर्ष

अंबाती रायडू- ३२ वर्ष

इमरान ताहीर- ३८ वर्ष

करन शर्मा- ३० वर्ष

मुरली विजय- ३३ वर्ष

सॅम बिलिंग्स- २६ वर्ष

शार्दुल ठाकूर- २६ वर्ष

जगदीसन नारायण- २२ वर्ष

मिचेल सॅन्टनर- २५ वर्ष

दीपक चाहर- २५ वर्ष