पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

पहिल्या वनडे भारताचा १० विकेटने पराभव 

Updated: Jan 14, 2020, 08:49 PM IST
पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

मुंबई : पहिल्या वनडे सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इतिहाच रचला आहे. तीन सामन्यांच्या या सीरीजमध्ये भारताचा 10 विकेटने पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा वनडे इतिहासातील हा 40 वर्षातील भारतावरचा सर्वात मोठा विजय आहे. या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलिया आता 3-1 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे. 

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय़ घेतला होता. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ने रोहित शर्माला 10 रनवर आऊट केलं. भारतीय टीमला पहिला झटका लवकर लागला तरी शिखर धवनन 74 आणि केएल राहुलने 47 रनची खेळी केली. राहुल 134 रनच्या स्कोरवर आऊट झाला. त्यानंतर 49.1 ओव्हरमध्ये भारतीय संघ 255 रनवर ऑलआऊट झाला. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत शानदार खेळ केला. ओपनर डेविड वॉर्नर (David Warner) आणि कर्णधार एरॉन फिंच (Aaron Finch) या जोडीने शतक ठोकले.ऑस्ट्रेलियाने हा सामना 10 विकेट्सने जिंकला. 37.4 ओव्हरमध्ये 258 रन करत भारताला पराभूत करत सर्वात मोठा विजय मिळवला. 

डेविड वॉर्नरने 112 बॉलमध्ये 128 तर फिंचने 114 बॉलमध्ये 110 रन केले. याआधी ऑस्ट्रेलियाने भारताला 5 वेळा 9 विकेटने पराभूत केलं होतं. पण हहिल्यांदा 10 विकेटने पराभव करत ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठा विजय मिळवला.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे बॉलर आज एकही विकेट नाही घेऊ शकले. जसप्रीत बुमराहने 7 ओव्हरमध्ये 50 रन दिले. शमीने 7 ओव्हरमध्ये 49 रन दिले. शार्दुल ठाकुरने पाच ओव्हरमध्ये 45 रन दिले. कुलदीप यादवने 10 ओव्हरमध्ये 55 रन दिले.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने तीन विकेट, पॅट कमिंस आणि केन रिचर्डसनने दोन विकेट घेतले. एश्टन टर्नर, एश्टन एगरने प्रत्येकी एक विकेट घेतली.