तिरूवअनंतपुरम : न्यूजीलंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. शास्त्री यांनी संभाव्य संकट टाळण्यासाठी ही पूजा केल्याचे बोलले जात आहे.
पूजेदरम्यान, शास्त्री यांनी 'अग्रशाला गणपती'ला नारळ वाढवला. सर्व संकटांपासून मुक्ती देणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. दरम्यान, शहरात आज (सोमवार) सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. त्यामुळे उद्या (मंगळवार) होणाऱ्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांसोबत इथल्या प्रसिद्ध मंदिरात आले आणि मनोभावे पूजा केली. ते साधार एक तासभर मंदिर परिसरातच होते.
शास्त्री जेव्हा चार वर्षांचे होते तेव्हा ते आपल्या आईसोबत मंदिरात आले होते. शास्त्रींनी सांगितले की, पुढच्या वेळी मी जेव्हा शहारत येईन तेव्हा मी माझ्या आईलाही सोबत घेऊन येईन.