तिसरी टी-20 : भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेनं २० ओव्हर्समध्ये १३५ रन्स बनवून ७ विकेट गमावल्या.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 24, 2017, 08:44 PM IST
तिसरी टी-20 : भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता  title=

मुंबई : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेनं २० ओव्हर्समध्ये १३५ रन्स बनवून ७ विकेट गमावल्या. श्रीलंकेच्या गुणरत्नेनं सर्वाधिक ३६ रन्स बनवल्या. तर शनकानं २४ बॉल्समध्ये नाबाद २९ रन्स केल्या.

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. कॅप्टन रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय बॉलर्सनी योग्य ठरवला आणि श्रीलंकेला ठराविक कालावधीनंतर झटके दिले. या मॅचमध्ये युझवेंद्र चहलच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली होती.

वॉशिंग्टन सुंदरनं ४ ओव्हरमध्ये २२ रन्स देऊन १ विकेट घेतली. तर मोहम्मद सिराजला ४ ओव्हरमध्ये ४५ रन्स देऊन १ विकेट मिळवण्यात यश आलं. जयदेव उनाडकटला २ आणि हार्दिक पांड्याला २ विकेट मिळाल्या तर कुलदीप यादवला १ विकेट मिळाली.

कटक आणि इंदूरमधली टी-20 भारतानं अगदी सहज जिंकली. त्यानंतर आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरची ही टी-20 देखील जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्याची चांगली संधी भारतीय संघापुढे आहे.