भारत टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर, ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानावर घसरण

 भारत आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये टॉप स्थानावर कायम आहे. पण ऑस्ट्रेलिया आज बांगलादेश विरूद्ध दोन टेस्ट मॅचची सिरीज बरोबरीत सोडल्याने ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 7, 2017, 08:13 PM IST
 भारत टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर, ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानावर घसरण  title=

दुबई :  भारत आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये टॉप स्थानावर कायम आहे. पण ऑस्ट्रेलिया आज बांगलादेश विरूद्ध दोन टेस्ट मॅचची सिरीज बरोबरीत सोडल्याने ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. 

भारताने  श्रीलंकेला त्यांच्याच जमीनीवर ३-०ने पराभूत केले त्यामुळे आता त्यांचे १२५ अंक असून प्रथम क्रमांकावर आहे. आता ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंडबरोबर ९७ अंक आहे. त्यामुळे दशम गणनेत ऑस्ट्रेलियाचे गुण कमी ठरले त्यामुळे ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर पोहचला आहे. 

न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. आज ऑस्ट्रेलियाने बांगलादेशसोबतची सिरीज १-१ने बरोबरीत सोडवली. या सिरीजपूर्वी स्टीवन स्मिथचे १०० अंक होते. ऑस्ट्रेलियाला चौथ्या स्थानावर कायम राहण्यासाठी बांगलादेशला १-०ने पराभूत करणे गरजेचे होते. पण पहिल्या कसोटीत बांगलादेशने पराभूत केल्याने ऑस्ट्रेलियाला एक स्थान खाली जावे लागले. 

भारतानंतर  ११० अंकासह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड १०५ अंकासह तिसऱ्या स्थानावर आहे.