मुंबई : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं पुढच्या वर्षी होणाऱ्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २०१८ साली इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारताशी भिडणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऍशेसमध्ये इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.
इंग्लंडची टीम पाकिस्तानविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळेल. पाकिस्तानविरुद्धची पहिली टेस्ट २४ मे रोजी लॉर्ड्सवर होईल आणि १ जूनला हेडिंग्लीमध्ये दुसरी टेस्ट खेळली जाईल. यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची टीम पाच वनडे आणि एका टी-20साठी इंग्लंडला जाईल. १३ जूनला सुरु होणारी वनडे सीरिज २४ जूनला संपेल त्यानंतर एक टी-20 २७ जूनला होईल.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानंतर भारत इंग्लंडविरोधात ३ टी-20, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅच खेळणार आहे. ३ जुलै, ६ जुलै आणि ८ जुलैला तीन टी-20 मॅच होतील तर, १२ जुलैपासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. १७ जुलैला तिसरी आणि शेवटची वनडे होईल. पाच टेस्ट मॅचच्या सीरिजला ९ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ही सीरिज ११ सप्टेंबरपर्यंत चालेल.
२०१९ साली होणारा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप इंग्लंडमध्येच होणार आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपच्या आधी भारताचा इंग्लंडमध्ये चांगला सराव होणार आहे.