India vs Sri Lanka | Krunal Pandyaनंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

Krunal Pandyaनंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. 

Updated: Jul 30, 2021, 02:24 PM IST
India vs Sri Lanka | Krunal Pandyaनंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा, टीम इंडियाच्या अडचणीत  वाढ

कोलंबो : टीम इंडियाच्या मागे लागलेलं विघ्न थांबायचं नाव घेत नाहीये. ऑलराऊंडर कृणाल पंड्यानंतर टीम इंडियाच्या आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भारतीय टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम या दोघांचा कोवीड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (india tour sri lanka 2021 yuzvendra chahal and  Krishnappa Gowtham tested covid positive)