India Vs Australia 3rd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळवली जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia 3rd Test) यांच्यात आज तिसरा कसोटी सामना सुरू असून या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी केली. आता इंदूर कसोटी जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या तयारीत टीम इंडिया (Team India) होती. मात्र भारताने 109 धावांवर आटोपला असून ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आता ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा दोन्ही संघांच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात बदल करण्यात आले आहेत. दरम्याम भारतीय संघाकडे सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. याआधी भारताने दोनवेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवले आहे. 2016 साली भारताने मायदेशात ही सीरीज जिंकली होती. मात्र हा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा : टीम इंडिया चॅम्पियनशिपची फायनल गाठणार? टॉस जिंकताच रोहित शर्माने घेतला 'हा' निर्णय
याशिवाय, या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली खास विक्रम करू शकला नाही. विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याने 58.22 च्या स्ट्राईक रेटने एकूण 10 हजार 829 धावा केल्या आहेत. ज्यात 34 शतक आणि 51 अर्धशतक झळकावली होती.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संघ- ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स केरी (डब्ल्यूके), कॅमरून ग्रीन, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन.